चंद्रपूर - एकी कडे देशांत करोना च्या विषाणू मुळे जनता त्रस्त होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डीझल चे दरवाढ करून जनतेला त्रस्त केल्या जात असताना आता देशाचा पोसिंदा आपला शेतकरी करोना काळात असाच भय भीत असतांना आता केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती मध्ये 40% वाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे कार्य केंद्र सरकार करीत आहेत.
ह्याचा निषेध म्हणून चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 17/5/2021 ला प्रियदर्शनी चौक चंद्रपूर येथे केंद्र सरकार चा जाहीर निषेध शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात घेण्यात आले आणि ह्या वेळी करोना नियमांचे पालन करीत केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या ह्या वेळेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर्, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, प्रदेश प्रतिनिधी सुरेश रामगुंडे, महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, किसान जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, शहर महासचिव संभाजी खेवले, अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्दीकी आदी उपस्थित होते.
Tags:
Chandrapur
