ब्रह्मपुरी - गुप्त माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा फाटा येथे पोलिसांच्या कारवाईत 2 लाखांच्या देशी दारुसहीत 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारू माफिया सक्रिय होत छुप्या मार्गाने दारू तस्करी करीत आहे, मात्र जिल्हा पोलिसांच्या तत्परतेने या तस्करांच्या मुसक्या आवळत आहे.
ब्रह्मपुरी पोलिसांना 11 मे ला तालुक्यात अवैध दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी बेटाळ फाट्याजवळ नाकाबंदी करून सापळा रचला.
काही वेळानंतर चारचाकी वाहन क्रमांक MH 34 K 8885 या वाहनाला पोलिसांनी अडविले व चौकशी केली असता गाडीमध्ये 90 ML देशी दारूच्या तब्बल 2000 नग बॉटल 20 खोक्यात आढळले.
दारूची किंमत 2 लाख व चारचाकी वाहनाची किंमत 5 लाख 50 हजार असा एकूण 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी खुशाल सिंग जुनी रा. उदापूर ता. ब्रह्मपुरी, सुरज सिंग जुनी रा. फुलेनगर ब्रह्मपुरी ता. ब्रह्मपुरी आरोपींना अटक करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, मुकेश गजबे, अमोल गिरडकर, विजय मैंद, अजय कटाईत, अजय नागोसे, अमोल ठेंगरी, शुभांगी शेमले आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
