चंद्रपूर - कोरोना काळात संचारबंदी असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे, आता तर अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीत अवैध सामानाची ने-आण होत आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वार्डातील समता चौकात दुर्गे नामक व्यक्तीच्या घरी भाड्याने राहणारे सोहेल शेख यांनी तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस कापूस बियाण्यांचा साठा जमा करून ठेवला होता.
ही बाब चंद्रपूर कृषी विभागाच्या भरारी पथकाला कळली असता भरारी पथकाचे शंकर किरवे यांनी आपल्या चमुसह धाड मारली असता आरोपी सोहेल शेख ने तिथून पळ काढला.
कृषी विभागाच्या चमूने त्या घरातील झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 50 ते 60 बॅगेत भरलेले कापूस बियाणे, पॅकिंग करणारी मशीन असा एकूण 70 ते 80 लाखांचा माल कृषी विभागाने जप्त केला.
सदर माल जप्त करीत आरोपीचा शोध सुरू आहे.