प्रशांत गेडाम
सिंदेवाही - दिनांक 31/05/2021 रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील ठाणेदार घारे, पीएसआय नेरकर, यांना मुखबिरद्वारे खबर मिळाल्याने पोलीस पथक सह रवाना होवून मौजा वासेरा ते जामशाळा ता.सिंदेवाही रोडवर नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान चारचाकी FIAT कंपनिची कार क्र . MH-43/4296 सिल्व्हर कलरची पोलिसांना संशयस्पद आढळल्याने पोलिसांनी सदर वाहनांची झडती घेतली असता, त्या वाहना मध्ये टायगर ब्रँड कंपनीची देशी दारु 16 नग खाकी खोक्यात त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये सह FIAT LINIA EMOTION कंपनिची चारचाकी सिल्वर रंगाची कार क्र .MH-43 - X4296 किंमत :- 5,00,000 रू.व आरोपी नाव- हीतेश किशन कोण्कूलवार वय 22 वर्ष रा. राजोली ता .मूल जि .चंद्रपूर व सोबत इतर दोन आरोपी मिळून आले.
नमूद आरोपिला सदर देशी दारू कुठून व कुणाकडून आणली याबाबत विचारणा केली असता सदर देशी दारु सुशांत बण्डिकवार रा.वासेरा ता .सिंदेवाही यांचे कडून जुन्या गोडावून मधून आणल्याचे सांगितले. हे आरोपीने सांगताच पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून सांगितले प्रमाणे सदर घटनास्थळ ची पंचासमक्ष पोलीसांनी झडती घेतली असता घरझडतीत,
रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारु 10 नग खाकी खोक्यात एकूण किंमत :- 1,07,000 /- रू चा माल असा एकूण 27 पेट्या देशी दारू चा माल.
सदर कारवाईत एकूण 7,67,000/- रू चा माल पंचा समक्ष जप्त करून एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. व पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा अधीक तपास पीएसआय नेरकर हे करीत आहेत.
