सिंदेवाही - बुधवार दिनांक 19/05/21 रोजी सिंदेवाही बाजार चौक ,जुना बस स्टॅन्ड येथील प्रवासी तसेच रस्त्यावर विनाकारण व बिना मास्क भटकणार यांची थेट रॅपिड अंटिजेन टेस्ट करून घेण्यात आली. यामध्ये एकूण 50 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील सर्व नमुने निगेटिव्ह आले आहेत.
सिंदेवाही शहरांमध्ये सिंदेवाही पोलिसांच्या अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर भटकणार यांची चांगलीच धावपळ झाली. प्रशासनातर्फे सतत आवाहन करण्यात येऊन सुद्धा काही लोक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे अशा प्रकारच्या चाचण्या करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सिंदेवाही पोलीस करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस ठाणेदार घारे यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नेरकर व वाहतूक पोलीस शिपाई सावसागडे, वैरागडे पोलीस हवालदार ठोबंरे तसेच ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायत सिंदेवाही येथील अधिकारी कर्मचारी पथक यांनी केले आहे.
