माजरी - एकार्जुना परिसरातील विटाभट्टी मालकाजवळ चालकाचे काम करणाऱ्या 35 वर्षीय शालीक जेणेकर यांचा वीटभट्टी परिसरातीलच रूममध्ये मृतदेह आढळल्याने कामगारांमध्ये चांगलीच खळबळ माजली.
राळेगाव फाट्याजवळ राहणारे वीटभट्टी मालक यांच्याजवळ शालीक अनेक वर्षांपासून चालकाचे काम करीत होता.
शालीक वीटभट्टी परिसरात रूम वर राहत होता, रात्री तो झोपायला गेला परंतु सकाळी कामगार कामावर आले पण शालीक त्यांना न दिसल्याने कामगार त्याच्या रूम वर पोहचले असता शालीक मृतावस्थेत पडला होता.
कामगारांनी याची माहिती माजरी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला.
पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.
