घुग्गुस - दि.16 मे रोजी नकोडा येथे आरोग्य उपकेंद्रात अनिल गुप्ता यांनी लस घेण्यास नोंदणी केली व कोविड लस घेतली. सद्या नकोडा उपकेंद्र नागरिकांन करीता आकर्षणाचा विषय ठरत आहे. या केंद्रावर डॉ. कोल्हे, डॉ. दास, विनय बोढे, गजानन साखरकर, राजेंद्र गांधी सर, पुष्कळ चौधरी अश्या अनेक व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर भेट देऊन लसिकरनाचा लाभ घेतला.
त्याअनुषंगाने येथिल सरपंच किरण बांदूरकर व उपसरपंच मंगेश राजगडकर यांनी येणाऱ्या व्यक्तीनं करीता उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे हे अतिशय आकर्षक लसीकरण केंद्र ठरत आहे.
लसीकरण केंद्रावर 200 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला . लसीकरण केंद्रावर उपस्थित ब्रिजभूषनजी पाझारे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य जि.प चंद्रपुर , डॉ. परमेश्वर वाकडकर यांची उपस्थिती होती.
उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची प्रथम व द्वितीय लस घेण्यास सोयीस्कर झाले.
यावेळी उपस्थित पं. स सदस्य सविताताई कोवे, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्राप सदस्य-अर्चना पाझारे , तनुश्री बांदूरकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रीतसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली,कंपा राजय्या,कांचन ताई वाकडे तसेच प्रा. आ.कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
