चंद्रपूर : कोरोनानंतर आढळलेल्या बुरशीजन्य घातक आजाराचे रुग्ण चंद्रपुरात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
: चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत mucormycosis आजाराचे 18 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. अत्यंत घातक असलेल्या या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. आधीच कोरोनाची दहशत आणि त्यात हा नवीन आजार, यामुळे आरोग्य यंत्रणा मोठ्या सावधपणे काम करीत असून, असे रुग्ण थेट नागपूरला पाठवले जात आहेत. सध्या जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांची पुष्टी केली आहे. यामुळे आरोग्य विभागणी कोरोना झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. यातील काही रुग्णांना तातडीने नागपुरात रवाना करण्यात आले आहे. या आजाराची लक्षणे आधी नाकाद्वारे काळा दुर्गंधी स्त्राव-मग हाडे डोळ्यांवर सूज-जबडा दुखणे- दात दुखणे अशी आहेत.
लवकर निदान आणि उपचार न झाल्यास नंतर हा आजार मेंदूपर्यंत पोचतो. mucormycosis मूळे चेहरा दुखत असल्यास लक्षणे समजून घेत त्वरीत उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
