घुगूस - शहरातील सुभाषनगर येथील वेकोली वसाहती मध्ये 1 एप्रिलला रात्री 11 वाजेदरम्यान अचानक क्वार्टर मधील जिन्याचा स्लॅब कोसळला.
रात्रीची वेळ असल्याने कुणीही त्या जिन्याच्या बाजूला नव्हते सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
मात्र खाली असलेल्या दुचाकीवर स्लॅबचा भाग कोसळल्याने वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले.
क्वार्टर क्रमांक Mq 35, 36, 39, 40 मध्ये प्रज्ञा साव, संतोष कुमार, सुधाकर भोंगळे व संतोष धुर्वे यांचे कुटुंब राहतात मात्र वेकोलीच्या निकृष्ट कामाचा फटका या कुटुंबांना बसला.
वेकोली मध्ये दरवर्षी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केल्या जाते, आमचे कर्मचारी किती सुरक्षित आहे याचा वाजगाजा केल्या जातो मात्र तो फक्त देखावा असतो, कर्मचारी कसे या वसाहतीमध्ये राहतात त्यांच्या संवेदना त्यांनाच माहीत.
मागील 25 वर्षांपासून अनेक वेकोली कर्मचारी त्या वसाहतीमध्ये कुटुंबासाहित राहतात, काही वर्षांपूर्वी वेकोली ने जुने व मोडकळीस आलेल्या क्वार्टरच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्या मात्र कंत्राटदाराने कसल्याही प्रकारची दुरुस्ती न करता फक्त काम चलाऊ पध्दतीने कार्य करीत सदर बिले उचलली.
आज जिन्याचा स्लॅब कोसळला उद्या क्वार्टर कोसळणार याची वाट वेकोली बघणार का असा प्रश्न सुभाषनगर येथील वेकोली कर्मचारी विचारत आहे.
