गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बूथ संपर्क अभियानांतर्गत २ मार्च रोजी आवाळपूर-भोयगाव पंचायत समिती क्षेत्रातील शक्तिकेंद्र पदाधिकाऱ्यांची बैठक आवाळपूर येथे घेण्यात आली.यात "मेरा बूथ सबसे मजबूत" या ओळीप्रमाणे बूथ अध्यक्ष नेमून समिती गठीत करणे, स्थापना दिन,गुढीपाडवा तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती संदर्भात कार्यक्रमांचे नियोजन तसेच कोविड लसीकरण विषयी तालुक्यात आढावा घेऊन पक्षातर्फे मदत कार्य करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी आनंदराव पाटील मुसळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष तथा तालुका बूथ संपर्क अभियान प्रभारी सतीश उपलेंचीवार यांची उपस्थिती होती. यावेळी जवळपास ३० बूथ सदस्यांचे समितीचे फॉर्म भरण्यात आले. बूथ हा निवडणुकीचा एक महत्वाचा भाग असून समिती प्रमुख व सदस्यांनी निवडणुक जिंकण्याच्या उद्देशाने बूथवर आपले काम चोख पारपाडावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
नवनिर्वाचित सर्व बूथ प्रमुख तथा सदस्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे, माजी सं.गां.नि.स.अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय मुसळे,भाजपचे जेष्ठ नेते भाऊराव कुळमेथे,सुरेश टेकाम,हिरापूर ग्रामपंचायत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या प्रमोद कोडापे, भाजप नेते गजानन भोयर कढोली,हिरापूर ग्रामपंचायत सदस्य रविन्द्र आत्राम,प्रमोद वराटे, सुधाकर हेकाड, विनायक कवाडे,भाजप नेते धर्मपाल वेलेकर, बंडू निराजने,भास्कर विधाते, अशोक उमरे,हिरामन सोनटक्के, भाजयुमो नेते साजित उमरे,मारोती झूगरे,बंडू वानखेडे, भालचंद्र मडावी,रवी टेकाम,लाला भाऊ,गणेश काटकर, देवांश मुसळे इत्यादी भाजपाचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
