चंद्रपूर शहर काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
चंद्रपूर : जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली असून, त्यामुळे स्वातंत्र्योत्तर ७० वर्षे भारत देश अखंड, सार्वभौम राहिला. लोकशाही दिवसेंदिवस मजबूत झाली. याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासीयांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दांत खासदार बाळू धानोरकर यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. तसेच करोनाचा प्रकोप पाहता डॉ. बाबासाहेबांची जयंती घराघरातूनच साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आज शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय कस्तुरबा चौकात प्रतिमेला पुष्पहार व मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून वंदन केले. यावेळी शहर अध्यक्ष रामू उर्फ रितेश तिवारी, युथ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावार, जेष्ठ काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर, नगरसेवक निलेश खोब्रागडे, ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, राजू रंगारी, अख्तर सिद्धीकी, संजय गंपावार, अशपाक हुसेन, मनीष तिवारी, प्रीती शहा, अश्विनी खोब्रागडे, राजू रंगारी यांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन रचनात्मक कार्याने भरलेले आहे. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच सर्वाना पुढे नेतील. अशा शब्दात खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारणे हिच त्यांना खरी आदरांजली – आ. सुधीर मुनगंटीवार
समता, स्वातंत्र् आणि बंधुभाव ही मानवी मुल्ये स्विकारलेला स्वाभिमानी आधुनिक समाज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करावयाचा होता. बाबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचा हाच खरा मुलाधार होता. ज्ञानाअभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती व समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणुन त्याचे अस्तित्व नाकारून त्याची क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षण विषयक धारणा होती. विषमतामुक्त शिक्षीत समाज हे त्यांचे स्वप्न होते. त्यांची शिकवण अंगीकारणे हीच त्यांच्या जयंती दिनी त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमीत्त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी महानगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवाणी, प्रकाश धारणे, ब्रिजभुषण पाझारे, विशाल निंबाळकर, रविंद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवार, रामकुमार आकापेल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन
जातिव्यवस्थेचे साखळदंड तोडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून सर्वांना समान हक्क व अधिकार मिळवून दिल्यानेच देशातील उच्च निच्च असा भेदभाव नष्ट झाला. मानवाला खरी ओळख मिळाली. त्यामुळेच मानव प्रगतीचे उच्चांक गाठत आहे, असे उद्गार आमदार किशोर जोरगेवार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना केले. यावेळी यंग चांदा ब्र्रिगेडच्या विदयार्थी शाखेचे अध्यक्ष अजय दुर्गे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे आदींची उपस्थिती होती.
घुगूस काँग्रेस कार्यालयात "भिमजयंती" संपन्न
घुग्घुस : विश्वरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 130 वी जयंती
घुग्घुस काँग्रेस कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कोरोना कोविड - 19 नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नुरूल सिद्दीकी, सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे उपस्थित होते.
घुग्गुस येथे मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानवास अभिवादन
बुधवार 14 एप्रिलला सकाळी 11 वाजता घुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
सामाजिक अंतराचे पालन करून साधेपणाने 130 वी भीमजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी घुग्गुस नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे रामचंद्र चंदनखेडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती प्रज्वलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्धवंदना घेऊन दोन मिनिट मौन पाळण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे म्हणाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे शिल्पकार व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला. त्यांनी भारतात जाती व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली.
समाजातील शोषित पीडित अस्पृश्याना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आपले जीवन वाहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभुषित शिक्षकतज्ज्ञ होते. समाजातील शोषित पीडित अस्पृश्यान साठी शिक्षणाचे दारे उघडी केली अश्या महामानवास मी विनम्र अभिवादन करतो असे प्रतिपादन केले.
यावेळी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीचे अनिरुद्ध आवळे,भारत चांदेकर, मनोहर भरणे भाजपा नेते ऋषीं कोवे दिलीप कांबळे,मधुकर धांडे घुग्गुस प्रिन्सी महिला बचत गटाच्या शारदा झाडे, वैशाली भालशंकर, शारदा फुलझले, छाया पाटील उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा अनुसूचित काँग्रेस तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
चंद्रपूर : विश्वरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेलच्या आदेशानुसार
14 एप्रिल रोजी सकाळी 11 :00 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
याकार्यक्रमाचे उदघाटन खासदार बाळु भाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भीमवंदना घेण्यात आली यानंतर केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी रितेश (रामू )तिवारी शहर जिल्हाध्यक्ष, दिनेश दादा चोखारे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,प्रकाश देवतळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, रोशन पचारे जिल्हाध्यक्ष किसान सेल,सोहेल शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल,सुनील पाटील, नंदू नागरकर,कुणाल रामटेके, प्रशांत भारती,घुग्घुस अध्यक्ष राजूरेड्डी, सौ. अश्विनी खोब्रागडे,सौ. अनुताई दहेगावकर, सुरज बहुराशी, सैय्यद अनवर,सौ. नेहा मेश्राम,कादर शेख,प्रीतम अट्टेला आदी उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे आयोजन पवन आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांनी केले आहे.