चंद्रपूर - 8 मार्चला वरोरा नाका चौकात स्थानिक गुन्हे शाखेने लालपेठ येथे राहणाऱ्या अजय रविदास ला अटक करीत त्याचेंजवळून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करीत अटक केली.
या कारवाईनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या मादक पदार्थाच्या तस्करी प्रकरणात मुळापर्यंत जाऊन चौकशी करू अशी प्रतिक्रिया दिली होती.
पोलीस निरीक्षक खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करीत चौकशी सुरू केली असता या प्रकरणात नागपूर येथे मादक पदार्थाच्या दुनियेतील मास्टरमाईंड चित्रा ठाकूर ला अटक केली. #News34
स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशी नंतर चित्राला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणात मोठे मासे अडकणार असून स्थानिक गुन्हे शाखेच्या बेधडक कारवाई ने मादक पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहे.
