भद्रावती - होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर बघायला मिळत आहे.
मात्र या महापुर थांबविण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यास मागे पुढे बघत असून नागपूर व मुंबई उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूवर कारवाईचा धडाका लावत आहे.
27 मार्चला सकाळी 8 वाजता आंबेडकर वार्डातील 31 वर्षीय गुलाब गोविंदा नान्हे यांच्याकडे धाड मारली असता देशी, विदेशी दारू किंमत 24 हजार रुपयांचा माल जप्त केला.
या प्रकरणात भद्रनाग वार्डातील 20 वर्षीय प्रतीक प्रकाश गेडाम यांना सुद्धा ताब्यात घेतले.
भद्रावती तालुक्यातील पोलिसांच्या नाकाखाली अवैध दारू सुरू असून कारवाई मात्र होताना दिसत नाही, तेच हाल चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे आहे.