गोंडपीपरी - गोंडपीपरी - धाबा या मार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने या मार्गावर अनेक अपघात झाले आहे.
आज दुपारच्या सुमारास गोंडपीपरी तालुक्यातील कुडे नांदगाव निवासी 25 वर्षीय अंकुश हरी नेवारे हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 ए एस 3778 ने आपल्या गावी जात होता, त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप क्रमांक एमएच ई एन 0395 ने अंकुश च्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की अंकुश घटनास्थळी ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह पोस्टमार्टम करीता पाठविण्यात आले, पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहे.