चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील खुनी पुलिया म्हणून ओळख असलेल्या वरोरा नाका पूल म्हणजेच स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर आज धुलीवंदनाच्या दिवशी अपघात झाला.
इंदिरा नगर निवासी 27 वर्षीय गोलू परचाके यांचा या अपघातात मृत्यू झाला.
गोलू परचाके हा गॅस सिलेंडर कंपनीत वाहन चालक म्हणून काम करीत होता.
आज वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर गोलू चे दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने गोलू रस्त्यावर घासत गेला, या घटनेत गोलुचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे वरोरा नाका चौकातील ह्या पुलाने अनेकांचे जीव घेतले, आज अनेक वर्षांनी त्या पुलावर घडलेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.
रामनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
