चंद्रपूर - बंगाली कॅम्प प्रभागातील अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांचेवर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक कारवाई करीत 2 महिण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे.
ही कारवाई 11 मार्चला करण्यात आली असून त्यांना 2 महिन्यासाठी तेलंगाना राज्यातील आसिफाबाद येथील एका जिल्ह्यात रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यास सांगितले आहे.
अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनमधून मिळाली आहे.
