चंद्रपूर - समाजाची सेवा करणारे अनेक समाज दुर्लक्षीत राहिले आहे. या समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ या समाजाला मिळावा तसेच समाजातील होतकरु युवकांना त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे या दिशेने माझे काम सुरु असून यात समाजाचेही सहकार्य लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जलनगर वार्ड येथे व्दितीय विदर्भस्तरीय मादगी समाज परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, मनोहर देवतळे, प्रकाश चेनुरवार, रामाजी शंकावार, बाबूराव चंद्रगीरीवार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थीती होती.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार पूढे म्हणाले कि, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतीनिधी म्हणून विचार करत असतांना या क्षेत्राच्या विकासाची माझी परिभाषा वेगळी आहे. कोणताही विकास करत असतांना त्यात प्रत्येक दुर्लक्षीत घटकाचा समावेश असला पाहिजे. मादगी समाज हा विकासापासून दुरावत चालला आहे. याचे अनेक कारणे आहे. मात्र आता कारणे पूढे न करता त्यावर तोढगा काढण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजे. समाजातील मुले प्रतिभाशाली आहे. मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवत येत्या काळात समाजातील युवकांच्या कुलाकुणांना वाव मिळावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगीतले. समाजाच्या समाज भवणासाठी दरवर्षी पाच लक्ष रुपये देण्याची घोषणाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहे. मात्र त्या निट पोहचत नसल्याने समाजाला योजनांचा लाभापासून वंचित राहावे लागते. मात्र आता हि परिस्थीती बदलविण्याची गरज आहे. समाज हिताच्या प्रत्येक योजना योग्यरित्या समाजाप्रयत्न पोहचविण्यासाठी आमचे नियोजन सूरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले, मातगी समाज हा कष्टकरी समाज असून समाजाची सेवा करणारा समाज आहे. त्यामूळे या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत विजय झालेल्या समाजातील नवनियूक्त सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.