ताजी बातमी - राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेवर नव्या जबाबदाऱ्या आल्या असून सेनेकडे मुख्यमंत्री पद, राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री व आता कांग्रेसकडे सुद्धा उपमुख्यमंत्री पद येणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच त्यांच्याकडे आता पक्षश्रेष्ठी कांग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविणार आहे. बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्रीसह कांग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे मात्र आता ते पूर्ण लक्ष मंत्री मंडळात देणार असून कांग्रेस पक्षाची जबाबदारी नाना पटोले यांचेकडे असणार आहे.
नाना पटोले हे विदर्भातील कांग्रेसमधील मजबूत असे नाव आहे, मध्यंतरी त्यांनी कांग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करीत खासदारकी जिंकली मात्र शेतकरी विरोधी भाजपचे धोरण असल्याने त्यांनी विरोध करीत खासदारकीचा राजीनामा दिला व पुन्हा कांग्रेस पक्षात प्रवेश केला.
विधानसभेची निवडणूक जिंकत त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली मात्र राज्यात कांग्रेस आपलं अस्तित्व गमावत असल्याने कांग्रेसला राज्यात नवा शिलेदार म्हणून पटोले यांची निवड करण्यात आली असून येणाऱ्या 2 दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
त्यांच्यासह 5 कांग्रेसचे कार्याध्यक्ष सुद्धा असणार, राज्यात कांग्रेसची उतरत्या कळेला ते कसे सावरणार याकडे आता कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.