प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - शहरातील बँक ऑफ इंडिया चौकातील श्री बालाजी ज्वेलरी दुकानांत अज्ञातांनी चोरी केल्याची घटना 6 फेब्रुवारीला उघडकीस आली.
नेहमीप्रमाणे सतीश रंगुवार हे दुकान बंद करून घरी गेले मात्र अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री च्या सुमारास 3 अज्ञात आरोपींनी शटर लॉक तोडत आत प्रवेश केला व चांदीचे आभूषण, अंगुठी, प्लेट यावर हात साफ केला, दुकानातील मुख्य तिजोरीला तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आरोपींना ते जमलं नाही त्यामुळे चांदीच्या वस्तू घेत ते पसार झाले.
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 3 आरोपी कैद झाले असून तिघांनी चेहऱ्यावर स्कार्फ लावला असल्याने त्यांना पकडण्याचं पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले आहे.
बँक ऑफ इंडिया चौकात अनेक बँकांचे एटीएम सेंटर आहे त्या सीसीटीव्ही मध्ये ते 3 आरोपी कैद झाले आहे, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे व पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे हे आपल्या ताफ्यासह पोहचले असून घटनेची चौकशी करीत आहे.
