प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - अमोनिया स्टोरेज टॉवर मध्ये कार्यरत असलेले सुरक्षारक्षक यांना मारहाण करीत त्यांचेजवळील 12 बोर रायफल व 10 जिवंत काडतुसे काही अज्ञात आरोपींनी 21 जानेवारीला पळविली होती.
या प्रकरणाची तक्रार घुगूस पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी गंभीरपणे या प्रकरणाचा तपास केला.
ACC CEMENT COMPANY GHUGUS येथील अमोनिया स्टोरेज टॉवर मधील सुरक्षारक्षक रामजी जग्गी सिंग व इरफान सिकंदर शहा यांची साक्ष पोलिसांनी नोंदवित तपासचक्रे फिरवली.
20 जानेवारीला असाच प्रसंग acc सिमेंट कम्पणीत भंगार चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता त्या घटनेत सुरक्षारक्षक श्यामसुंदर प्रजापती यांनी त्या अज्ञात चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना याच प्रकारे मारहाण करण्यात आली होती.
तक्रारीच्या आधारे घुगूस पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले असता आम्हीच सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याची कबुली दिली, यामध्ये आरोपी 24 वर्षीय प्रशांत उर्फ पशी मालवेणी, 20 वर्षीय कार्तिक उर्फ नानी कोडापे, 26 वर्षीय श्रीकांत उर्फ चिट्टी सोप्पारी, बबलू पिंगली व विजय उर्फ अंड्या भास्कर यांना अटक करीत त्यांचेजवळून 12 बोर रायफल आणि 5 काडतुसे जप्त केली.
सदरची कारवाई सपोनि नागलोत, पीएसआय गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, महेंद्र वन्नकवार, सचिन बोरकर, नितीन मराठे यांनी यशस्वी केली.
