गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय,महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स,महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी व विद्यामंदिर यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार एड.विठ्ठलराव धोटे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संस्थेच्या संचालिका उज्वलाताई धोटे,संचालक रामचंद्र सोनपितरे, प्रतिभाताई धोटे,प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक मुख्याधिपिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदीप परसुटकर व बबन भोयर यांनी तर प्रा.आशिष देरकर यांनी आभार व्यक्त केले.
