वरोरा - चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश घेतला.
कांग्रेस मध्ये असताना संजय देवतळे यांनी सांस्कृतिक मंत्री व पालकमंत्री पद उपभोगले मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातून उमेदवारी मिळाली मात्र त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना कांग्रेसने तिकीट नाकारले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेत वरोरा विधानसभा निवडणुक लढली मात्र त्या Union minister Nitin Gadkari निवडणुकीत सुद्धा त्यांचा पराभव झाला, वर्ष 2018 ला त्यांनी पुन्हा पक्ष बदलवीत शिवसेना पक्षात प्रवेश घेत वरोरा विधानसभेत नशीब अजमावल मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला आता पुन्हा त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश घेतला. Ex-minister Sanjay Deotale
ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक पक्ष बदलविले. News34 Chandrapur
निवडणूक आली की पक्ष बदलायचं नंतर पक्ष संघटनेपासून दूर व्हायचं असा फंडा माजी मंत्री देवतळे यांनी सुरू केला की काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात उदभवू लागला आहे.
