चंद्रपूर - : जिल्हा कारागृह चंद्रपूर येथे समता फाऊंडॆशन , चंद्रपूर तसेच जिल्हा सामान्य रुग्नालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदीजंनासाठी नेत्र तपासणी शीबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कारागृह अधिक्षक वैभव आगे, तर प्रमुख अतिथी म्हणून नेत्र चिकित्सक अधिकारी डॉ.येरमे, डॉ. निशा चांदेकर, डॉ.माधुरी कुळसंगे तर समता फाऊंडेशन च्या वतीने विवेक झोडे, विकास भुरसे ,तर प्रमुख उपस्थितीमध्ये वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम , अतिरिक्त वरिष्ठ तुरुंगाधिकारी रवींद्र जगताप, फार्मासिस्ट आय एच इनामदार, तुरुंग शिक्षक ललित मुंडॆ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित अतिथींचे कारागृहाच्या वतीने स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी यांच्या चमूने कारागृहातील बंदीजन तसेच कारागृह कर्मचारी यांची नेत्र तपासणी केली व त्यातील लाभार्थी बंदीजनांना लवकरच संस्थेच्या वतीने त्वरीत चष्म्याचे वितरण करण्यात असल्याची माहिती दिली. (Chandrapur jail eye check camp)
कारागृहातील 176 बंदी बांधव तसेच भगिनींनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.कारागृहाच्या वतीने अधीक्षक वैभव आगे यांनी संस्थ्येच्या या उपक्रमाबद्द्ल त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुरुंगाधिकारी. नागनाथ खैरे ,सुनिल वानखडे, विठ्ठल पवार , सुभेदार श्री शिवराम चवळे, श्री.सीताराम सुरकार, रक्षक गौरव पाचडे यांनी परिश्रम घेतल
