नागभीड : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मिंडाळा येथे तारेच्या कुंपणात अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला. गावाच्या सीमेवर असलेल्या सदगुरु कृपा राईस मिलचे हे कुंपण आहे. लगतच्या जंगलातून गावाकडे येत असताना या मिलच्या तारेच्या कुंपणात त्याचे पाय अडकले. स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. Leopard dies
माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शवविच्छेदनानंतर नेमके कारण पुढे येण्याची शक्यता विभागाने व्यक्त केलीय. News34 Chandrapur
