प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - देशात कोरोना आला व सर्व यंत्रणा ठप्प पडली, शाळा, महाविद्यालय अजूनही उघडले नाही, यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले मात्र शाळा व्यवस्थापन फी ची वसुली करीत आहे.घुगूस शहरातील व्हियानी विद्यामंदिर कॉन्व्हेंट मधील विद्यार्थ्यांच्या पालकवर्गानी एकत्र येत 50 टक्के फी माफ करावी असे निवेदन शाळा व्यवस्थापन कडे दिले आहे. Vhiyani vidya mandir convent ghugus
कामगार वर्गातील पाल्यांचे अनेक मुले या काँव्हेन्ट मध्ये शिक्षण घेतात, कोरोना काळातील लॉकडाउन मध्ये अनेकांचे रोजगार गेले, हाताला काम नाही त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता 50 टक्के फी माफ करावी असे निवेदन देण्यात आले. News34 chandrapur
यावेळी शंकर सिध्दम, श्रीनिवास बहादुर, गाेकुल एदुलवार,मेट्टा ओदल, वेणु पुरेल्ली, स्वामी जंगम, कुमार जंगम,बत्तीनी सुरेश,प्रविन बनपुरकर, शरद झाडे, राजु पथाडे,सुधीर वडसकर,अभीष गाेहकर, कुमारस्वामी नर्रा,लक्षण पुरेल्ली, उपस्थित होते.
घुग्गुसच्या पालकवर्गाने शाळा प्रशासनाशी चर्चा करून पालकवर्गाची बैठक घेण्याची मागणी उपप्राचार्य सिस्टर शेल्ला यांना केली आहे.
