गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ग्रामीण कार्यकर्ता मेळावा राज्याचे गृहमंत्री ना.अनील देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथे नुकताच पार पडला.यात गडचांदूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गडचांदूर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान(क्वार्टर)उपलब्ध करून देण्याची मागणी गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. Gadchandur Police
गडचांदूर शहर हे औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. याठिकाणी पोलीस बांधवांना शासकीय निवासस्थान नसल्याने नाईलाजास्तव यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी किरायाच्या घरात राहावे लागत आहे. News34 Chandrapur
यांना होणार्या अडी अडचणी लक्षात घेऊन यांच्यासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी शासकीय निवासस्थानांची उभारणी करून द्यावी अशी मागणी रायुकाँचे मयुर एकरे,वैभव गोरे,सदाशीव गिरी इतरांनी मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
