प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - 27 जानेवारीला शहरातील वार्ड क्रमांक 6 चांदणी नगर मध्ये राहणाऱ्या ज्योती कंडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये सोनं चोरी गेल्याची तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने कंडे या मुलांना घरी ठेवून बाहेर गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करीत 15 ग्राम सोन्याची पोत किंमत 51 हजार रुपयेचा ऐवज चोरून नेला.
कंडे यांच्या तक्रारीवरून सपोनि नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोखरे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आमटे यांनी तपास सुरू केला असता शेजारी राहणारे 30 वर्षीय सागर मुरकुटे यांना चौकशीसाठी बोलाविले असता त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर आकाश ने चोरीचा गुन्हा कबूल करीत चोरी गेलेली सोन्याची पोत जमा केली.
आरोपी सागरचे फिर्यादी यांच्या घरी शेजारी असल्याने येणे जाणे होत असायचे.
पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीला तक्रार दाखल झालेल्या म्हणजे 27 जानेवारीला सायंकाळी अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पो.शी मनोज धकाते व डीबी पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
