ताजी बातमी - राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नामक महिलेने बलात्काराचे सुरू केल्यावर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून या सर्व प्रकरणात मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले व ती महिला मला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने हे आरोप करीत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या सर्व आरोपांवर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत आहे. Dhananjay munde rape allegations case big twist
मात्र या सर्व घडामोडीत गुरुवारी सगळ्यात मोठा ट्विस्ट समोर आला असून भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी अंधेरी येथील आंबोली पोलीस स्टेशनला पोहचून रेणू शर्मा विरोधात ब्लॅकमेलिंग करीत असल्याची तक्रार देण्यासाठी पोहचले आहे.
वर्ष 2010 व 15 दरम्यान रेणू शर्माने माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत ब्लॅकमेल करू लागली होती. Ex mla krushna hegde
माझ्यासारखे अनेक अशे नागरिक आहे ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे, मुंडे यांच्यावर रेणू शर्मा ने आरोप केल्यावर मला समोर यावं लागलं कारण कुणी त्या महिलेविरोधात समोर न आल्याने तिची हिम्मत वाढली आहे, आता हे प्रकार कुणासोबत घडायला नको म्हणून मी तक्रार द्यायला समोर आलो आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी दिली आहे. News34 chandrapur
कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.
मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.
6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.
“दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं.
“आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.
