चंद्रपूर - सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत शहरातील नगीनाबाग व बंगाली कॅम्प येथील सिमेंट कॉंक्रीट रोड व नालीचे काम मंजूर करण्यात आले असून आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कामांचे भुमीपूजन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, विश्वजीत शाहा, रशीद हुसेन, राहूल मोहूर्ले, हेरमन जोसेफ, वैशाली मेश्राम, दुर्गा वैरागडे, वैशाली काटकर, तापोष डे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या इतर कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून शहरातील विविध भागात विकास कामे केल्या जात आहे. यातील अनेक कामे प्रगती पथावर आहे. तसेच विविध निधी मार्फत शहरातील अनेक कामे प्रस्तावीत आहे. News34 Chandrapurदरम्यान आ. जोरगेवार यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांना आता सुरवात होवू लागली आहे. नगीनाबाग प्रभाग क्रं ९ मधे १७ लक्ष ६ हजार रुपये निधीतून येथील देवगडे यांच्या घरापासून ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत तसेच बंगाली कॅम्प वार्ड क्रं ४ मध्ये नितीन बावणे यांच्या घरापासून ते जितू जूमनाके यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रोड व नालीचे काम प्रस्तावीत आहे. आज या कामाचे भुमीपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. प्रत्येक प्रभागातील मुळ गरज लक्षात घेत त्या दिशेने विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे मार्ग बनविण्यात यावे अशी येथील नागरिकांची जूनी मागणी होती. निवडणूकी दरम्याण हा रस्ता बनविण्याचे मी आश्वासन दिले होते. Mla Kishor Jorgewar
आज त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे. याचे मला समाधान असल्याचे मत यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.
