हिंगणघाट - शहरातील चर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली असून 11 जानेवारीला 3 जणांची साक्ष अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या समक्ष नोंदविण्यात आली.
आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे यांनी हिंगणघाट शहरात एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते, उपचारादरम्यान त्या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला होता, घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात बघायला मिळाले होते. Burn alive professor in hinganghat
फिर्यादीकडून सरकारी वकील उजवल निकम हे युक्तिवाद करीत आहे तर आरोपिकडून नागपूरचे एड. भुपेंद्र सोने करीत आहे.
12 व 13 जानेवारीला इतर जणांची साक्ष घेण्यात येणार असल्याची माहिती वकिलांच्याया वतीने देण्यात आली आहे.
