चिमूर - 3 वर्षाचा धीरज खेळायला घराबाहेर गेला मात्र परत त्याचा मृतदेह आल्याने भानारकर कुटुंबीयांनी अक्षरशः टाहो फोडला. News34 chandrapur
ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशीच धीरज गेल्याने भानारकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
शहरातील मासळ मार्गावरील वाल्मीक चौक येथे रस्त्यावर खेळत असलेल्या बालकाला मासळ कडुन येनाऱ्या चार चाकी वाहनाने धडक दिल्याने बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना गुरुवारला दोन वाजता घडली मृतक बालकाचे नाव धिरज शंकर भानारकर वय ३ वर्ष गुरुदेव वार्ड वाल्मीक चिमूर येथील रहीवासी आहे. Chimur accident 3yrs boy die
चिमूर मासळ रोड वरील शहरालगत असलेल्या वाल्मीक चौकात रोडलगत मृतक धिरज खेळत होता चावडी चौक येथुन येनाऱ्या चार चाकी वहान फोर्ड कंपनी ची गाडी एमएच 34 एम 9355 ने धडक दिली यात धिरज भानारकर गंभीर जखमी झाला गाडी चालक व मालकांने त्या बालकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मुंबई मोटर व्हेईकल अक्ट नुसार गुन्हा दाखल करून गाडी चालक सतीश इंदूरकर अटक केली पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे
