चंद्रपूर - राज्य शासनाच्या निर्देशानुसार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला मोफत रक्त मिळावे असे धोरण आहे मात्र कोरोना विषाणूच्या भीतीने रक्तदान कार्यक्रम कमी होऊ लागले. Record 1 thousand bags of blood in chandrapur
मात्र सामाजिक भान म्हणून चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन विद्युत प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारीवर्गानी केले.
आयोजित महारक्तदान शिबिरात तब्बल 1 हजार रक्त पिशवीचे विक्रमी रक्तसंकलन करण्यात आले.
नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर रक्तपेटीला हे रक्तपिशव्या पाठविण्यात आल्या असून चंद्रपूर जिल्हा रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी याबाबत उत्तम नियोजन केले. News34 Chandrapur
सदर महारक्तदान शिबीर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, वर्धापन दिन कमिटीचे सचिव सुहास जाधव, अधीक्षक अभियंता, उपमुख्य अभियंता राजेश ओसवाल, किशोर राद्वत, मदन अहिरकर, राजू सोमकुंवर, पुनसे, उपासे, बोरकर मॅडम, अनिल गंधे, अरविंद वानखेडे, आनंद वाघमारे, डॉ. संगीता बोधलकर, राजकुमार गिमेकर, प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थी व वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक आभासिंग, सीआयएसएफ डेप्युटी कमांडन्ट पूर्वपेंद्र कुमार व सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक साळवे यांनी अथक परिश्रम केले.
