News34 chandrapur
चंद्रपूर : प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गैरव्यवहार संदर्भात चर्चेत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील संशयास्पद निविदेच्या चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
1 crore tender
महानगरपालिका हद्दीतील वडगाव प्रभाग व भानापेठ प्रभाग येथील कॉक्रीट रस्ते, नाल्या, कंपाउंड वाल, पेव्हींग ब्लॉकचे काम, फर्नीचर व पेंटींगचे काम आदी कामांची नविन निविदा १० जानेवारी २०२२ ला काढण्यात आली. तशी रीतसर निविदा जाहीरात वृत्तपत्राला देण्यात आली. Chandrapur municipal corporation
सदर कामे ही जवळपास करोड रुपयांची आहे. या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र वास्तविक ही सर्व कामे याअगोदरच झालेली आहेत. तरी या कामांची नविन निविदा जाहीरात काढून महानगरपालिकेने उघड उघड भ्रष्टाचाराचा घाट घालून जनतेच्या करातून गोळा केलेले एक करोड रुपये खिशात घालण्याचा प्रताप सुरु केला आहे.1 crore corruption
या निविदा जाहीरातीची व सदर कामांची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली होती. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेने सदर निविदा रद्द करून गैरव्यवहारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. Aam aadmi party chandrapur
आम आदमी पार्टीने या विरोधात महानगरपालिकेसमोर निषेध नोंदविला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसाच्या आत अहवाल व आणि अभिप्राय सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे आदेश नगरपरिषद प्रशासन चे प्रादेशिक आयुक्त संघमित्रा डोके यांनी जारी केले आहेत. या चौकशी अंती महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे होईल, असे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सुनील मुसळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
