प्रतिनिधी/गुरू गुरुनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या नफ्यामधून केवळ शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी आणि शेतकऱ्यांचे आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी शेतकरी कल्याण निधीची तरतूद करण्यात आली असून जमा झालेल्या शेतकरी कल्याण निधीचा उपयोग शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुधारणेसाठीच व दुःखात सहभागी होऊन घरी जाऊन मदत देणे हेच बँकेचे कर्तव्ये आहे. असे मत CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. मुल तालुक्यातील गांगलवाडी येथील अल्पभूधारक गरीब शेतकरी श्री खुशाल मारोती गेडाम हा अनेक दिवसांपासून कँसरच्या आजाराने त्रस्त असून त्याच्या उपचारासाठी व त्याचा जीव वाचविण्यासाठी बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून तीस हजार (३०,०००) रुपये शेतकरी कल्याण निधीमधून मदत म्हणून रुग्णाला चेक देतांना ते बोलत होते. खुशाल गेडाम याला आर्थिक मदतीची नितांत गरज असल्याची माहिती कांग्रेसचे नेते तथाव बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना सचिन केवे यांनी सांगितल्या बरोबर संतोषसिंह रावत यांनी गांगलवाडी येथे तात्काळ कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या प्रत्यक्ष घरी जाऊन चेक दिला. याप्रसंगी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे सभापती राकेश रत्नावार, सचिन केवे ग्रा. प.सदस्य कोमल केवे राजोलीचे कांग्रेस पदाधिकारी सुनील गुज्जनवार, सामाजिक कार्यकर्ते गुरु गुरनुले, बँकेचे अधिकारी नंदुजी मंडवि, सुरज रामटेके, मेघशाम शेंडे, राजोलीचे उपसरपंच गजानन ठिकरे यांचेसह ग्राम पंचायत सदश व गांगलवाडी वासीय नागरिक उपस्थित होते. कॅन्सरग्रस्त रुग्णास मदतीची गरज लक्षात घेऊन cdcc bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारी एकमेव बँक असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी बँकेचे सूत्रं हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या हित जोपासण्यासाठी बँकेला मिळालेल्या आर्थिक नफ्यातून धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कँसर सारखे दुर्धर आजार झाल्याने शेतकरी खचतो म्हणून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत देऊन रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना धीर दील्याबद्दल गांगलवाडी ग्राम पंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संतोषसिंह रावत व बँकेचे आणि समस्त संचालक मंडळांचे आभार मानले आहे.