वरोरा - तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी वरोरा तालुक्यातील आटमुर्डी येथील ग्रामसेवकाने तक्रारदाराला 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे सम्पर्क साधला, सापळा रचत वरोरा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सदर ग्रामसेवकाला 5 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार यांच्या चुलत बहिणीच्या शेतात बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या घरचे सांडपाणी येत असल्याने शेतातील पिकाचे नुकसान होत होते यावर तक्रारदाराने संबंधितांवर कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या कार्यालयात अर्ज केला असता पुढील कारवाई साठी तो अर्ज ग्रामसेवक लोकेश शेंडे यांच्याकडे पाठविण्यात आला. Anti corruption trap warora
मात्र तक्रारदाराला तुमच्या बाजूने अहवाल देतो पण त्यासाठी 5 हजार रुपये लागेल अशी मागणी ग्रामसेवक शेंडे यांनी केली, पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला. Breaking News
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी तक्रारीची पडताळणी केल्यावर 27 डिसेंम्बरला सापळा रचत 5 हजार रुपये रंगेहात घेताना ग्रामसेवक शेंडे यांना अटक करण्यात आली. Chandrapur acb
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला सो.,ला.प्र.वि. नागपूर, मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर, मधुकर गिते ,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि नागपूर यांच्या मार्गदर्शनात अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक, नापोशि अजय बागेसर, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, पोशी.वैभव गाडगे,चालक पोशी.सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केली.