चंद्रपूर - स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर असून, राज्यातील २७ महानगरपालिकेत स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला असता चंद्रपूर शहर महानगरपालिका पहिल्या तीनमध्ये समाविष्ट आहे, ही गौरवाची बाब असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर मनपातर्फे आयोजित रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाच्या वितरण कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते.
पण चंद्रपूर शहर खरंच स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर आहे का? याबाबत समाजसेवी भूषण फुसे यांनी मनपाची पोलखोल केली आहे.
शहरातील बाबूपेठ प्रभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या मागील भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची घाण त्या भागात पसरलेली आहे.
अनेक वर्षांपासून पडक्या स्थिती मध्ये असलेले हे शौचालय पालिकेच्या स्वच्छतेची पोलखोल करीत आहे."
या स्वच्छतेसाठी चंद्रपूर मनपाला अधिकचा पुरस्कार देता येणार काय? असा प्रश्न समाजसेवी social worker भूषण फुसे यांनी विचारला आहे.
मनपातील भाजपचे पदाधिकारी किती खोटे बोलतात याचं उदाहरण बघायचं असेल तर त्यांनी बाबूपेठ भागातील या शौचालयाची दयनीय अवस्था एकदा तरी बघायला हवीचं.
सदरील शौचालयामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यावर पालिकेने तात्काळ उपाययोजना करायला हव्या अशी मागणी समाजसेवी भूषण फुसे यांनी केली आहे.
