प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर,तालुका मूलच्या वतीने नेफडो च्या मुल तालुका उपाध्यक्षा अल्काताई राजमलवार यांचा मुलगा स्नेहलकुमार राजमलवार यांचा वाढदिवस २१/ १०/२०२१ असल्याने याच दिनाचे औचित्य साधून अल्का ताई राजमलवार यांनी मुलाच्या वाढ दिवसाच्या निमित्याने मूल तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडावर "पडझरी " या छोट्या गावात गावकऱ्यांना स्वतःच्या वतीने जीवनावश्यक असलेल्या किराणा किटचे वाटप नेफडोच्या विभागीय,जिल्हा आणि तालुका स्तरीय पदाधिकारी यांचे हस्ते करणयात आले.
प्रसंगी नागपुर विभाग उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे नागपूर विभाग सचिव सौ रत्नाताई चौधरी, जिल्हा सचिव सौ सुषमा कुंटावार, कविता ताई मोहूर्ले जिल्हा संघटिका, तालूका संघटक गुरुदास चौधरी, जिल्हा संघटक, श्रीरंग नागोशे,तालुका संघटक, अल्काताई राजमलवार तालुका उपाध्यक्षा, वंदनाताई गुरुनूले तालुका संघटिका ,इंदूताई वाढई तालुका संघटिका, इंदूताई मांदाडे तालुका संघटिका, नंदाताई शेंडे तालुका संघटिका, कल्पना मेश्राम इत्यादी उपस्थित होते. गरीब आदिवासी बांधवांना जीवनावश्यक असलेली किराणा वस्तूची किट मिळाल्याने संयोजक अल्काताई राजमलवार व नेफडो च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आदिवासी बांधवांनी जाहीर आभार मानले.
