तळोधी(बा.) कृषिविभागातंर्गत सुरु असलेल्या " कृषिसंजीवनी सप्ताह " अतंर्गत नागभिड तालुक्यातील जनकापूर येथे नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका कृषि अधिकारी श्री एन.व्हि. तावसकर, मडंळ कृषि अधिकारी कु.शिन्दे, कृषिपर्यवेक्षक श्री सजंय पाकमोडे, कृषि साहाय्यक डि.बि.देशमुख, ग्रामपंचायत सरपंच सौ. वैशाली गायधने, शेतकरी मित्र श्री राहुल रामटेके, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमिताने मान्यवरानी बिजप्रक्रिया, खत बचत, अँझोला लागवड, आदी शेतीविषयक विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कृषिसाहाय्यक श्री डि.बि.देशमुख यांनी केले, तर उपस्थिताचे आभार शेतकरीमित्र श्री राहुल रामटेके यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी उपस्थित होते.