पोंभुर्णा - शरीराच्या व मनाच्या ऊत्तम आरोग्यासाठी नियमितपणे योग करणे आवश्यक आहे. २१ जुन आतंरराष्ट्रीय योग दिवस पोंभुर्णा येथे सकाळी ६ वाजता राजराजेश्वर मंदिरासमोरील पटांगणावर साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात योग समितीचे तालुका अध्यक्ष दिलीप मॕकलवार आणि योग समितीचे प्रदिप दिवसे ,आशाताई गुडेपवार ,सुनिता मॕकलवार तसेच सुनिता रमेश ढुमणे ( M.A. योगशास्र् ) सोनापुर यांचे भारतीय जनता पार्टि तर्फ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, अजीत मंगळगिरीवार, ईश्वर नैताम, रुषी कोटरंगे, हरी ढवस, मोहन चलाख ,गजानन मडपुवार ,माजी नगराध्यक्षा स्वेता वनकर ,माजी ऊपनगराध्यक्षा रजीया कुरेशी ,नेहा बघेल तसेच भाजपा पदाधिकारी आणि योगसमिती सदस्य ऊपस्थित होते.
सिंदेवाही भाजपतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
योगदिनाच्या औचित्याने योगशिक्षकांचा सत्कारही संपन्न.
( प्रशांत गेडाम)
सोमवार, दि. २१ जून.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सिंदेवाही तालुका यांचेवतीने आज सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात सामुहिक योग करत योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शहरातील योगशिक्षक सैनी मॅडम, वानखेडे सर तसेच पतंजलीचे तालुकाध्यक्ष राजूभैय्या धामेजा यांना शाल मोमेंटो, प्रमाणपत्र व वाफारा मशिन भेट देवून गौरविण्यात आले.
या योग कार्यक्रमाला, जि. प. चे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, माजी नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई गेडाम, पं. स. सदस्य रितेश अलमस्त, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, नगरसेविका छाया हाडगे, ग्रा. प. सदस्य रितेश घुमे आदिंसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि योगाभ्यासी आवर्जून उपस्थित होते.