चंद्रपूर/ताडाळी - ताडाळी आरोग्य केन्द्रा मधे MBBS डॉ नसल्या मुळे रुग्णाचा उपच्यार आरोग्य केन्द्र मधे बरोबर होत नव्हता रुग्णाला चद्रपुर ला रेफर करावे लागत होते. ही समस्या लक्षात घेता सरपंच आणि सदस्य यांनी MBBS डॉ ची आरोग्य केन्द्रास गरज आहे अस मुख्य आरोग्य अधिकार्यास लक्षात आणुन दिले असता यांची दखल घेत डॉ व्यकटेश भंडारी यांची नियुक्ति ताडाळी आरोग्य केन्द्रात करण्यात आली.
डॉ व्यकटेश भंडारी यांचे आरोग्य केन्द्रा मधे स्वागत करताना सरपंच संगीता अशोक पारखी, उसरपंच निखिलेश चामरे,ग्राम.प सदस्य संजोग अड़बाले,अशोक मडावी, बबन कसवटे, मालतीताई आमटे, कविताताई निखाड़े,अनुताई उगे यांची प्रामुख्याने उपस्थित होते.