राजुरा - तालुक्यातील सुमठाना गावातून अवैध सागवान लाकडाचा साठा केल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना समजल्याने त्यांनी छापा टाकला. त्यामध्ये ८ हजार रुपये किमतीचे सागवान लाकूड त्यांनी जप्त केले.
सविस्तर वृत्त असे कि, राजुरा वन विभागातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुमठाना येथील दौलत सुर्तेकर यांचे घरी छापा मारून ८ हजार ८९ रुपये किमतीचे सागवान लाकूड व अवजार जप्त करत दौलत सुर्तेकर यांस अटक करण्यात आली.
मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सुमठाणा नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 154 मध्ये सागवान झाडाची अवैध तोड झाल्याचे समजताच वन कर्मचारी त्या चौकशीचे मार्गावर होते दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांना गुप्त माहिती मिळताच अधिनस्थ वन कर्मचारी क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते, वनरक्षक मीरा राठोड, मनोज वानखेडे, संजय चौबे, वनमजुर शामराव खेडेकर, प्रभूदास धोटे यांनी सुमठाणा येथील दौलत सुर्तेकर यांचे घरी धाड टाकून झडती घेतली असता बेकायदेशीर रित्या सागवान झाडाचे लाकूड आढळून आले. मोका पंचनामा करून सुमारे 8 हजार 89 रुपयांचे सागवान, अवजारे व साहित्य जप्त करण्यात आले. या अवैध वृक्षतोड प्रकारात अन्य काही व्यक्ती सहभागी आहेत का? किती झाडाची, कुठल्या वनक्षेत्रातून झाडे तोडण्यात आले याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीस अटक अटक करून वन गुन्हा दाखल करून पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.