मूल - मागील काही दिवसापासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असून आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे.
23 मे ला मूल वनपरिक्षेत्रातील मारोडा बिट कम्पार्टमेंट क्रमांक 779 मध्ये 68 वर्षीय मनोहर आडकूजी प्रधान हे आंब्याचे पाने तोडण्याकरिता जंगलात गेले होते.
त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांचेवर अचानक हल्ला चढविला या हल्ल्यात मनोहर यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी 8 वाजता सर्व कामे आटोपून मनोहर हे जंगलात गेले होते, उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बाहेर येत असल्याने लगतच्या नहराजवळ वाघ पाणी पित होता.
दुपारपर्यंत मनोहर हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी जंगलात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला.
मृतक मनोहरचा पाय तोडलेला आणि गळा चिरलेला दिसल्याने वाघानेच त्याला ठार केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहीती होताच वनपरीक्षेञ अधिकारी जी.आर.नायगमकर, क्षेत्र सहाय्यक पाकेवार, वनरक्षक उईके, पारधे आणि ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतक मनोहर प्रधाने यांच्या कुटूंबियास वनविभागाने २५ हजार रूपयाची तातडीची मदत दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत 19 नागरिकांचा वाघाने बळी घेतला आहे.
