गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील आवारपूर जवळ असलेल्या हिरापूर गाव कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला असून येथील अनेक कुटूंबाना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चित्र आहे.
आवारपूर,बिबी,नांदाफाटा हा औद्यागिक परिसर आधीच हाॅटस्पाॅट असताना २० नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हिरापूर येथे वाढता संसर्ग पाहता परिसरातील नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
विनाकारण बाहेर पडू नये अशा सूचना वारंवार ग्रामपंचायतीकडून देण्यात येत असतांनाही नागरिक बाहेर फिरत आहे आणि कोरोनाला आमंत्रण देत स्वतःचा व परीवाराचा जीव धोक्यात घालत आहे.कोविड आजाराची सौम्य लक्षणे असणार्यांना गृह विलगीकरणात राहण्याचे सांगितले जाते ग्रामीण भागात अनेक कुटुंबाकडे स्वत:ची वेगळी खोली वेगळे बाथरूम वेगळे शौचालय नाही यामुळे होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांच्या कुटुबांना कोरोनाचा संसर्ग होत आहे होम आयसोलेशन मुळेच औद्योगिक परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आता ग्रामीण भागातही धोकादायक परिस्थिती आहे.