चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चंद्रपूर येथील शाखेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असून माजी अध्यक्षांच्या तुरुंगवारी नंतर नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळात आर्थिक घोटाळा मी पुन्हा येईन म्हणत परत आला.
घोटाळ्याचा आकडा दीड कोटींवर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, रोखपाल पदावर असलेल्या व्यक्तीने केली ग्राहकांची फसवणूक केली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ग्राहकांनी दिलेले पैसे अकाउंटला न टाकता स्वतः खिशात टाकायचा, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता प्रकार, एका सहकारी सोसायटीने भरायला दिलेली मोठी रक्कम खात्यात जमा न झाल्याने हे बिंग फुटले.
जिल्हा परिषदेच्या समोर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत हा घोटाळा झाला असून रात्री जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत व संचालक रवींद्र शिंदे हजर होते, पूर्ण खात्यांची माहिती घेत, सर्व अहवाल तपासण्याचे काम रात्री या शाखेत सुरू होते.
मनोहर पाऊनकर यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याची तक्रार देणारे संचालक आता सुद्धा तक्रार करणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे आहे. #News34Chandrapur
मात्र या घोटाळ्याची चाहूल लागताच खातेदारांमध्ये पुन्हा अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसात तक्रार देण्याची तयारी सुरू, किती ग्राहकांना फसवले, याचा तपशील चौकशीत समोर येणार.
