चंद्रपूर - "आपदा मे अवसर" हे वाक्य या कोरोना महामारीत खरं ठरलं आहे, आज नागरिकांना जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे, ही कोरोनाची लाट सामान्य नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
शहरात तर अक्षरशः रेमडीसीविर, एम्ब्युलन्स चालक व डॉक्टर्स या हतबल नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे, या हतबल व कोरोना सोबत लढत असलेल्या नागरिकांच्या मदतीला देवरूपी चंद्रपुरातील रॉबिन हुड सारखेच डॉ. गावतुरे दाम्पत्य धावून आले आहे.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दररोज हजारोच्या वर बाधितांची भर पडत आहे, मृत्युदर वाढला आहे.
मात्र अश्यातच आर्थिक दृष्ट्या ढासळलेल्या कोरोना बाधित परिवाराच्या दुःखाला समजून डॉ. अभिलाषा व डॉ. राकेश गावतुरे हे दाम्पत्य निःशुल्क उपचार करण्यासाठी पुढे आले.
काही दिवसांपूर्वी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आपला हा मानस समाजमाध्यमांवर व्यक्त केला त्या दिवसापासून त्यांना दररोज शेकडो फोन येत आहे, त्यांच्या हॉस्पिटल मध्ये रुग्णाच्या रांगा लागत आहे.
14 दिवसाच्या गृह विलीगिकरणात सुद्धा रुग्णाला प्रतिदिवस 3 ते 6 हजार रुपये लागत आहे मात्र संचारबंदीच्या काळात रोजगार गमावलेले व आर्थिक दृष्ट्या खचलेल्या नागरिकांसाठी डॉ. गावतुरे देवदूतासारखे पुढे आले.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना अशी सेवा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
आज जिल्ह्यात रेमडीसीविर, ऑक्सिजन व बेडसाठी नागरिक आस लावून असतात आपल्या रुग्णाचे कसे होणार? ह्या विचारात ते खचून गेले आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी निशुल्क सेवा देण्याचा मनोदय जाहीर करताच त्यांना रोज शेकडो फोन कॉल्सला उत्तर द्यावे लागत आहे. कोविड रुग्णांनी अशा पद्धतीच्या सेवाभावी वृत्तीची गरज असल्याचे सांगत यांच्या प्रयत्नांना भरभरून पाठिंबा दिला आहे.
आजघडीला गृह विलीगिकरणासाठी विलीगिकरण अर्जावर खाजगी डॉक्टरची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे मात्र त्या अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी खाजगी डॉक्टर हजारो रुपये लाटत आहे, मात्र ही स्वाक्षरी करण्यासाठी डॉ. अभिलाषा गावतुरे ह्या निःशुल्क अर्ज व स्वाक्षरी करीत सेवाभावी कार्याला पुढे नेत आहे.
डॉ.अभिलाषा व डॉ.राकेश गावतुरे दाम्पत्यांच्या कार्याला मानाचा मुजरा ! आपल्या सारख्या सेवाभावी लोकांची आज आणिबाणीच्या काळात जनतेला नितांत गरज आहे. पद्मश्री डॉ. बाबा आमटे यांची ही कर्मभूमी.या कर्मभूमीत आपल्या सारखे हात समोर यावेत अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही.आपल्या कार्यापासून बाकीच्या डॉ.मंडळींनी प्रेरना घेऊन हातात हात घालून काम केल्यास आपल्या जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होवू शकते.यामुळे भयभीत झालेल्या रोग्यास आधार मीळू शकतो.आज पेशंटचे मनोधैर्य वाढविणे जास्त गरजेचे आहे.आपल्या कार्यास परत एकदा शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाHats off both of u
हटवाSalute Dr.Abhilash ma'am......!!!
उत्तर द्याहटवाअतुलनीय कार्य ताई
उत्तर द्याहटवाआजच्या काळात चन्द्रपूरचे डॉ.सधन आहे त.कोरोनाकाळात.जर डॉ नी सेवाभावी वृत्तीने काम केले तर नक्कीच आपला जिल्हा कोरोनामुक्त होणार.पहा जमतंय का
उत्तर द्याहटवाडॉ. गाव तुरे दाम्प्त्यांचा अभिमान वाटतो. त्यांचे कोरोना काळातील हे नि:स्पृह कार्य माणुसकी ची जाणीव व खरी तळमळ दर्शवणारी आहे. प्रशंसनीय कार्य.
हटवाचंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा डॉ. आमटे परिवाराने ज्याप्रमाणे बिकट व असापेक्ष परिस्थिती ची जाणीव करून इतिहास रचला त्याच प्रमाणे आज माननीय डॉ. गावतुरे परिवार ज्या गरजू रोग्याच्या मदतीला धावून आले अशा समाजनिरोगी करणाऱ्या डॉ.गावतुरे परिवाराला माझा मानाचा मुजरा.
उत्तर द्याहटवादोन्ही गावतुरे डाॅ. रांना माझा मतदानाचा मुजरा .
उत्तर द्याहटवा👋👋अतुलनीय समाजसेवा 👋👋
उत्तर द्याहटवामानसातील खरी मानुसकी दाखवीली सर व मँडम यांच्ये करावो तितके कौतुक कमीच...
उत्तर द्याहटवाWe r proud of you mam & sir we salute you & hope every Doctor should follow you. By helping together we can change this pandemic situation
उत्तर द्याहटवामाणसातील मानुसकीचे प्रत्यक्ष दर्शन..
उत्तर द्याहटवामानाचा मुजरा 🙏🙏
मॅडम आणि सर खरचं आपण अशा बिकट परिस्थितीत लोकांना आधार देत आहात. कोरोनाग्रस्त आणि मनानी खचलेल्या लोकांना आपण मदतीचा हात समोर केला ह्यातून समाजानी , राजकीय नेत्यांनी व डॉक्टरांनी बोध घ्यायला हवा. असाच विचार चंद्रपूर मधील सर्व डॉक्टर व राजकीय नेत्यांनी केला तर चंद्रपूर जिल्हा नक्कीचं कोरोना मुक्त होऊ शकतो.
उत्तर द्याहटवाआपल्या अतुलनीय कार्याबद्दल मनाचा मुजरा !